शानदार!! जबरदस्त!!! ज़िंदाबाद!!!
शानदार!! जबरदस्त!!! ज़िंदाबाद!!! असेच काहीतरी वाटेल तुम्हाला ‘माँझी- धि माउंटेन मॅन’ चित्रपट बघून. एक साधीशी स्टोरी घेऊन तुम्हाला जर नवाजउद्दीन सिद्दीक्की सारखा ऍक्टर (हीरो नाही) आणि केतन मेहता सरखा डायरेक्टर भेटला असेल तर तुम्ही एक अप्रतिम कलाकृती सादर करू शकता. हयाचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘माँझी- धि माउंटेन मॅन’. सत्यकथेवर आधारित चित्रपट बनवताना खूप काही गोष्टीचे तारतम्य बाळगावे लागते. सत्यकथेला फाटा न देता त्यात रोमांस, गरीबी, कॉमेडी टाकत चित्रपट सजवणे तसे म्हटले तर मुश्कील असते. पण लेखकांच्या टीमने आणि डाइरेक्टर ने ते चांगले हाताळले आहे आणि आपल्या समोर एक व्यवस्थित बांधलेली कलाकृती सादर केली आहे. राधिका आपटेने सुद्धा तिला मिळालेल्या संधीचे चांगले सोने केले आहे. तिचा अभिनय पण अप्रतिम झाला आहे. तिचे मॉडर्न लुक बघायची सवय झालेली असून सुद्धा तिचा गावरान लुक चित्रपट संपल्यावर ही लक्षात राहतो. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अथांग प्रेमं असले की पर्वत ही माणसा पुढे फिका पडतो हेच ह्या चित्रपटात दाखवले आहे. मग त्यात येणारे नैसर्गिक अडथळे, मानवी अडथळे, शारीरिक अडथळे सुद्...