Posts

Why Marathi Matters

Image
 There’s a small plant in my courtyard. I water it every day. I don’t say much to it, but it listens. It grows, slowly. One day, I forgot to water it. Just one day. By the next evening, its leaves were wilting, its stem drooping. That moment reminded me — Anything that is alive, needs care. Even your language. Marathi , for me, is just like that plant. It has deep roots. It carries the scent of soil, the warmth of tradition, the voice of my grandmother. If we don’t nurture it, speak it, cherish it — it will wither. And one day, we’ll lose more than just a language. We’ll lose a part of who we are. These days, people are asking more and more: “Why is Marathi so important?” Some say it’s a regional language, only useful at home, not in the global world. But those who say that have probably forgotten what it feels like to fall asleep in their grandmother’s lap, listening to her stories in Marathi. Remember that moment? When she began: “Ek hota raja…” When she taught you mora...

मराठी का गरजेची?

Image
 माझ्या घरात एक छोटंसं झाड आहे. रोज त्याला पाणी घालतो, त्याच्यावर प्रेम करतो. एक दिवस विसरलो… आणि दोनच दिवसांत त्याच्या कोवळ्या फांद्या वाकायला लागल्या. तेव्हा जाणवलं – कुठलीही गोष्ट टिकवायची असेल, तर तिला प्रेम, काळजी आणि सातत्य हवं. मराठी भाषा सुद्धा असंच एक झाड आहे. ती आपली मुळं आहेत. जर आपणच तिला पाणी घालणं थांबवलं, तिला वापरणं कमी केलं, तिला मागे टाकलं… तर ती हळूहळू सुकून जाईल. आणि एक दिवस आपणच आपली ओळख हरवून बसू. आज महाराष्ट्रात वारंवार एक प्रश्न ऐकू येतो – “मराठी भाषा का गरजेची आहे?” काहींना वाटतं, मराठी फक्त शाळा, गाव आणि घरापुरती मर्यादित असावी. पण ही भाषा फक्त बोलण्याचं साधन नाही – ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे. लहानपणी आपण सगळ्यांनी आजीच्या कुशीत झोपताना तिच्या गोष्टी ऐकल्या आहेत – त्या सगळ्या मराठीतूनच. ती गोष्टी सांगताना चेहऱ्यावरच्या हावभावातून संस्कार करत होती. “एक होता राजा...” म्हणणारी आजी जेव्हा एखाद्या गोष्टीला “उपकार विसरू नयेत” म्हणायची, तेव्हा फक्त शब्द नव्हते ते – ती आपल्याला आपली माती शिकवत होती, आपलं माणूसपण शिकवत होती. आजकाल मुलं इंग्रजीमध्ये बोलताना...

झुंड

 मुळात नागराज अण्णा फ्रेमच्या माध्यमातून व्यक्त होणारे व्यक्ती आहेत. त्यांची जितकी स्क्रिप्ट महत्वाची असते त्याहून अधिक महत्व असतं फ्रेमला. बोराडे मास्तर जेव्हा या मुलांमधील पोटेनशीयल ओळखतात तेव्हा तो फक्त गड्डी गोदाम पुरता मर्यादित असतो.पण, तिथून देशभरातील अगदी मोनिका गेडाम ते तिकडे उत्तरप्रदेश , आसाम सारख्या राज्यातील लेकरांना प्लॅटफॉर्म दिसायला लागतो. मोनिका गेडाम सारखी मुलगी जिचा शाळेचा , जन्माचा असा कुठला दाखला नाही ती या 'फुटबॉलच्या' , बोराडे मास्तरांच्या माध्यमातून विदेशात जाते. इतर टीम सर्वच... यांच्यात साम्य काय आहे? झोपडपट्टीमधून, गरीब घरातून आलेली मुलं.  अगदी बोराडे मास्तरच्या घरात गेल्यावर ते उभ्या आयुष्यात पहिल्यांदा कुण्यातरी आरसीसीच्या घरात बसलेली असतात. नागराज अण्णा अशा स्टोरीतून या मुलांना स्टारडम उपलब्ध करून देतोय. यासाठी खूप जास्त कस लागतो. अगदी हिरो बनणारी लोकं मुंबई जवळ करतात पण नागराज या लोकांना शोधत पार गोंदिया जिल्ह्यातील दुर्गम खेड्यात जाऊन माणसे शोधतो. मोनिका गेडामचा बाप केवळ सिनेमात आदिवासी नाही राहत. तो खऱ्या जीवनातही आदिवासीच असतो.त्याच्या घरी अजून...

शाळा-कॉलेजमध्ये जातीय व धार्मिक उन्माद

 शाळा-कॉलेजमध्ये जातीय व धार्मिक उन्माद हा आधीपासूनच होता. फक्त फरक होता यात तो असयाचा चार भिंतीत आता ग्राऊंडवर आलाय. शाळा-कॉलेजच्या इमारतीमधील जातीय व धार्मिक उन्माद उघडपणे प्रीमयसेसमध्ये यायला खरं तर तसा तुलनेने उशीरच झालेला आहे. कर्नाटकमध्ये जे काय चाललंय ते उघड दिसणारे असल्याने आपण यावर बोलू शकतोय, बघू शकतोय.. एक मत तयार करू शकतोय. कर्नाटक तर काय पुरोगामी राज्य वगैरे नाहीये. पण, देशात सतत पुरोगामी राज्य म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्रातील शालेय संस्थांच्या इमारतीमधील वास्तव काय कर्नाटकपेक्षा वेगळं नाहीये. तुलनेने यात विद्यार्थी कमी मास्तरलोक जास्त सक्रिय असतात. कुछ दिन तो गुजारो पुणे के शाळा कॉलेज में... (इतर ठिकाणी पण स्थिती काय वेगळी नाहीये) असो. या सर्वात सहभाग असतो तो स्त्रियांचा... जात-धर्माची वाहक, प्रचारक ही स्त्री तुलनेने अधिक असते. हिजाब घालून जाणारी मुलगी असो वा भगव्या ओढण्या घालून जाणाऱ्या मुली किंवा कुणाला तरी समर्थन वा विरोध दर्शवणारे निळे दुप्पटे यात विवेकाचे, माणूस पणाचे आणि भूमिकेचे कमी अधिक माणूसपण, आचरण फक्त फरक करण्यासारखे दिसून येईल. कट्टरता मात्र सारखीच असते...
 एकटी राहणारी लोक भावनिक असतात. त्यांना भीती असते गुंतण्याची. त्यांच्यात हिंमत नसते नकार पचवण्याची. सहवासात राहून काहींना त्या व्यक्तीची सवय होते तर काहींना प्रेम. सवय झालेली लोक सहवास तुटला की दुसऱ्या कुण्या व्यक्तीच्या सहवासात सहज निभावून जातात. प्रेम झालेला माणूस. कोसळतो. झुरतो. किंवा मग कायम एकटा होऊन जातो. गर्दीतसुद्धा एकटा राहायला लागला की समजून जायचं. याला आता कुणाच्या सोबतची गरज नाही तर कुणी सोबत राहिले तर प्रेम होऊन त्रास होण्याची भीती जास्त आहे. ती व्यक्ती अलिप्त होते. भावनिक गुंता सोडून व्यावहारिक एकत्र होत आपला कार्यभाग साध्य करते. अनोळखी शहरात जाऊन तिथेच कायम राहावं. इच्छा झाली तरी कुणाशी ओळख करू नये. सर्वांकडे बघून फक्त गोड स्माईल देऊन आपल्या कामाने पूढे निघून जावं. कुणाला नाव विचारू नये.कुणाशी गट्टी जमवू नये. कुणाच्या डोळ्यात बघू नये. पूर्ण चेहरा व्यक्तीचा बघून आपल्याकडे बघतोय तर फक्त येऊ अनोळखी चेहऱ्याने स्माईल देऊन पूढे निघून जावं. आपल्याच कामात व्यस्त राहून इतकं थकून भागून परतावं की झोपी शिवाय कुणी सखा वाटू नये. स्वप्नांशिवाय इतरत्र कुठेही संवाद होऊ नये. इतरांना आ...

एक कट्टर 'मरा'ठवाडाकर

 किती शहरं, किती घरं- दारं !!😢😢 आमच्या फक्त T.C वर नाही तर कपाळावर सुद्धा लिहून ठेवलंय भटके विमुक्त 😢😢 त्यामुळे अडाणी बापे-बाया पवार, पाटील, विखेंच्या कारखान्यावर,  कवळी पोरं मुंबई-पुण्यात टाटा-बाटाच्या कारखान्यात,  कोणी गुजरात मध्ये शहा, पटेलच्या ऑइल, कापड मिल मध्ये ..  तर कोणी मध्यप्रदेशात शर्मा, सिंधीयाच्या गोडाऊन मध्ये हमालीला.😢 आमच्या भागात पाणी नाही, मोठ-मोठी धरणं, प्रकल्प नाहीत, कसले कारखाने नाहीत, चांगल्या शाळा-कॉलेज नाहीत, काही भाग सोडला तर अजून अख्ख्या जिल्ह्यात रेल्वे सुद्धा नाही.😢😢 धड रस्ते नाहीत की नीट दवाखाने नाहीत. हाताला काम नाही.  फक्त युवा नेते, सामाजिक कार्यकर्ते अन बोगस पत्रकारांचा सुळसुळाट.. तरीही आम्ही यडझव्या गत गर्वाने सांगतो की आमच्या भागातले लै लोकं आहेत पुण्यात अन ठाण्यात सुद्धा 😢😢 बावळ्यांनो झोपडपट्टीत इतके असल्याचा कसला आलाय अभिमान ? दूर देशात हमालीला जाऊन सुद्धा यांना आपापल्या जातीच्या पुढाऱ्यांचा, जातीचा माज वाटतो. खरंतर लाज वाटायला पाहिजे. तिथं कार्यक्रम ठेवतात, सप्ता घालतात.😠 त्यांच्या फोटोचे टी-शर्ट घालून त्यांचाच ऊस त...

सोनिया गांधी

 त्यांना गांधींचा खून करता येतो. पण, गांधींना प्रातःस्मरणीय मानल्याशिवाय आणि गांधींचा आदर्श सांगितल्याशिवाय पंतप्रधान होता येत नाही. ही या देशाची खासियत आहे.  गांधींच्या या वाटेवरून हमखास चालणारी आणि जगात काही झाले, इकडचे जग तिकडे झाले, तरी त्या मूल्यात्मकतेला जिवापाड जपणारी खात्री म्हणजे सोनिया गांधी.  कमला हॅरिस आणि जेसिंडा अर्ड्रनच्या यशकथांमध्ये रमणा-यांनी 'सोनिया गांधी' नावाची यशकथा कधीतरी नीट समजून घ्यायला हवी.  विरोधात असताना ही बाई सगळा विरोध एकटीनं अंगावर घेते आणि सत्तेत असताना, त्या सत्तेचा वाराही स्वतःला लागू न देता इतरांना सिंहासनावर बसवते. तिला विदेशी ठरवून ज्यांनी तिची साथ सोडली, त्यांना अखेरीस तिच्या क्षमाशीलतेनंच सत्ता मिळू शकली. तिच्यावर नको ती टीका करणा-या पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठीही तिच्याच होकाराची वाट पाहावी लागली.  आपल्या नव-याच्या मारेक-यांनाही माफ करणारी ती मुळातच क्षमाशील. खरा भारत समजलेली बाईच हे करू शकते. तिला राम समजला, कृष्ण समजला, बुद्ध समजला, पैगंबर समजला, येशू समजला, गुरू नानक समजला, कबीर समजला. गांधींचा आतला आवाज समजला....