शाळा-कॉलेजमध्ये जातीय व धार्मिक उन्माद
शाळा-कॉलेजमध्ये जातीय व धार्मिक उन्माद हा आधीपासूनच होता. फक्त फरक होता यात तो असयाचा चार भिंतीत आता ग्राऊंडवर आलाय. शाळा-कॉलेजच्या इमारतीमधील जातीय व धार्मिक उन्माद उघडपणे प्रीमयसेसमध्ये यायला खरं तर तसा तुलनेने उशीरच झालेला आहे. कर्नाटकमध्ये जे काय चाललंय ते उघड दिसणारे असल्याने आपण यावर बोलू शकतोय, बघू शकतोय.. एक मत तयार करू शकतोय. कर्नाटक तर काय पुरोगामी राज्य वगैरे नाहीये. पण, देशात सतत पुरोगामी राज्य म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्रातील शालेय संस्थांच्या इमारतीमधील वास्तव काय कर्नाटकपेक्षा वेगळं नाहीये. तुलनेने यात विद्यार्थी कमी मास्तरलोक जास्त सक्रिय असतात. कुछ दिन तो गुजारो पुणे के शाळा कॉलेज में... (इतर ठिकाणी पण स्थिती काय वेगळी नाहीये) असो. या सर्वात सहभाग असतो तो स्त्रियांचा... जात-धर्माची वाहक, प्रचारक ही स्त्री तुलनेने अधिक असते. हिजाब घालून जाणारी मुलगी असो वा भगव्या ओढण्या घालून जाणाऱ्या मुली किंवा कुणाला तरी समर्थन वा विरोध दर्शवणारे निळे दुप्पटे यात विवेकाचे, माणूस पणाचे आणि भूमिकेचे कमी अधिक माणूसपण, आचरण फक्त फरक करण्यासारखे दिसून येईल. कट्टरता मात्र सारखीच असते. हिजाब, आणि विविध धार्मिक प्रतिनिधित्व करणारे रंग असणारे दुप्पटे जेव्हा मुली घालून येतात. तेव्हा यावर अंमल हा पुरुषांचा असतो. तिच्या चॉईसचा नाही. वेळ, काळ आणि संख्या बघून पुढे येते एवढंच.
तर मूळ मुद्दा हा आहे की हा समाज, देश तुमच्या हातात बदलवणे दिवसागणिक कठीण होत चालले आहे. कारण आता झुंडी तयार होतील असे मजबूत ब्रँड मार्केटमध्ये आले आहेत. सोशल मीडिया, शाळा-कॉलेज, मेन्स्ट्रीम मीडिया यातून हे प्रशिक्षण तुमच्या कळत-नकळत एकदम परफेक्ट दिले जातेय. इथून पुढे तूम्ही पैदा केलेला मुलगा-मुलगी धार्मिक उन्मादी नसावी, ट्रोलर नसावी, कुठल्याही धार्मिक समूह, जात व त्यातील मक्तेदारांची बटीक नसावी. त्याने-तिने माणूस म्हणून पुढे यावं फायद्याचा नसला तरी नुकसानकारक होऊ नये अशी व्यक्ती व्हावी वगैरे व्हावी वाटत असेल तर सर्वात आधी तुम्ही स्वतः बदललं पाहिजे आणि त्यासोबत तुमच्या पाल्याला. बाहेरील जग बघून माणूस जितका अस्वस्थ होतो तितकाच एका वेळेनंतर समाज म्हणून कोडगासुद्धा झालेला असतो. आणि म्हणूनच देशभरात शाळेच्या मैदानावर प्रजसत्ताक दिनाचे स्नेहसंमेलन कमी आणि धर्माच्या तालमी जास्त होत चालल्या..
akshay mohan kambekar
Comments
Post a Comment