प्रेम लव
प्रेम लव या शब्दांमधेच जादु आहे ना? अगदी सगळ्यांना भुरळ पाडणारी. प्रेत्येक तरुण तरुणींच स्वप्न आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा, तो आपण शोधावा म्हणजे आपल लव मॅरेज व्हाव.. एक गोड स्वप्न. चित्रपटां मधुन दाखवतात तस गाणी गुणगुणायला लावणार काहीतरी थ्रील असलेल आपण करतोय, आमिर खानच्या पहला नशा या गाण्यासारख तरंगत ठेवणार. शाळेतल्या काही नववी दहावी च्या मुलांच्या तोंडी सुध्दा असत तर माझ किनी त्या मुलीवर प्रेम आहे...प्रेम म्हणजे काय नक्की कळालेलही नसत त्या वयात प्रेम सुध्दा होत, हसु आल ना.. गंमत नाही वस्तुस्थिती आहे. कॉलेज मधे तर तारुण्याचा नुसता सळसळता उत्साह एखादी मुलगी नुसती आवडायचा अवकाश लगेच तिच्यावर प्रेम जडते अगदी love at first sight हीच ती जिच्या मी शोधात होतो आणि मग तिच चिंतन सुरु आभ्यास नको, करीयर नको ते काय रे नंतर करता येइल... फ़क्त तिने मला हो म्हणाव... काय कमी आहे माझ्यात... ती अशी का करते? नाही का म्हणते?..... तु हा कर या ना कर तु है मेरी... हिरोंचे आदर्श आहेतच समोर. या सगळ्या भुलभुलय्यात वेळ आणि वय कस भुरकन निघुन जात. मुलगी नाही करीयर नाही. अगदी दहावी बारावीत बोर्डात आलेले सुध्द...