झुंड
मुळात नागराज अण्णा फ्रेमच्या माध्यमातून व्यक्त होणारे व्यक्ती आहेत. त्यांची जितकी स्क्रिप्ट महत्वाची असते त्याहून अधिक महत्व असतं फ्रेमला. बोराडे मास्तर जेव्हा या मुलांमधील पोटेनशीयल ओळखतात तेव्हा तो फक्त गड्डी गोदाम पुरता मर्यादित असतो.पण, तिथून देशभरातील अगदी मोनिका गेडाम ते तिकडे उत्तरप्रदेश , आसाम सारख्या राज्यातील लेकरांना प्लॅटफॉर्म दिसायला लागतो. मोनिका गेडाम सारखी मुलगी जिचा शाळेचा , जन्माचा असा कुठला दाखला नाही ती या 'फुटबॉलच्या' , बोराडे मास्तरांच्या माध्यमातून विदेशात जाते. इतर टीम सर्वच... यांच्यात साम्य काय आहे? झोपडपट्टीमधून, गरीब घरातून आलेली मुलं. अगदी बोराडे मास्तरच्या घरात गेल्यावर ते उभ्या आयुष्यात पहिल्यांदा कुण्यातरी आरसीसीच्या घरात बसलेली असतात. नागराज अण्णा अशा स्टोरीतून या मुलांना स्टारडम उपलब्ध करून देतोय. यासाठी खूप जास्त कस लागतो. अगदी हिरो बनणारी लोकं मुंबई जवळ करतात पण नागराज या लोकांना शोधत पार गोंदिया जिल्ह्यातील दुर्गम खेड्यात जाऊन माणसे शोधतो. मोनिका गेडामचा बाप केवळ सिनेमात आदिवासी नाही राहत. तो खऱ्या जीवनातही आदिवासीच असतो.त्याच्या घरी अजून...