प्रेम
प्रेम म्हणजे काय ? असं मी अजिबात विचारत नाहीये कुणाला, कारण ते समजण्यासाठी आधी प्रेमाला अनुभवावं लागतं, त्याला जगावं लागतं, ते सांगेल तसं वा-यासारखं त्याच्यासोबत कधीकधी मुक्तपणे वाहवं लागतं,तर कधीकधी त्याला एखाद्या पिंज-यातील कैद पक्ष्याला मोकळं करतो तसं त्याला त्याच्या पध्दतीने जगण्यासाठी आपल्या प्रेमपाशातुन मुक्तही करावं लागतं. कारण ते तुमच खरं प्रेम असेल तर नक्कीच तुमच्याकडे परत येईल हे मनाला माहित असतं म्हणुन याच आशेवर तर त्याला आपण या मतलबी मायावी जगात सैराट सोडलेलं असतं. कारण बाहेरच जग कितीही लोभस सुंदर नयनरम्य असलं तरी ते आपल्या माणसांशिवाय फिकच वाटतं. सारं काही असुनसुध्दा काहीच नसल्यासारख....शेवटी तुम्ही स्वताला कितीही माडर्न हाय प्रोफाइल समजत असले तरी प्रेमाचा माञ एकच क्लास एकच स्टैंडर्ड असतो, जिथे जगत असतांना प्रत्येकाला कितीही सोयीसुविधा टेक्नोलॉजी ने उपलब्ध करुन दिल्या तरी प्रेमाची जागा त्या घेऊही शकत नाही की प्रेमाला रिप्लेस ही करु शकत नाही. म्हणुनच प्रत्येकाला प्रेमाची गरज ही निसर्गनियमानुसार लागतेच अन ते स्वाभाविकच आहे. कारण प्रेम आता मानवी जिवनाचा अवि...