एक कट्टर 'मरा'ठवाडाकर
किती शहरं, किती घरं- दारं !!😢😢 आमच्या फक्त T.C वर नाही तर कपाळावर सुद्धा लिहून ठेवलंय भटके विमुक्त 😢😢 त्यामुळे अडाणी बापे-बाया पवार, पाटील, विखेंच्या कारखान्यावर, कवळी पोरं मुंबई-पुण्यात टाटा-बाटाच्या कारखान्यात, कोणी गुजरात मध्ये शहा, पटेलच्या ऑइल, कापड मिल मध्ये .. तर कोणी मध्यप्रदेशात शर्मा, सिंधीयाच्या गोडाऊन मध्ये हमालीला.😢 आमच्या भागात पाणी नाही, मोठ-मोठी धरणं, प्रकल्प नाहीत, कसले कारखाने नाहीत, चांगल्या शाळा-कॉलेज नाहीत, काही भाग सोडला तर अजून अख्ख्या जिल्ह्यात रेल्वे सुद्धा नाही.😢😢 धड रस्ते नाहीत की नीट दवाखाने नाहीत. हाताला काम नाही. फक्त युवा नेते, सामाजिक कार्यकर्ते अन बोगस पत्रकारांचा सुळसुळाट.. तरीही आम्ही यडझव्या गत गर्वाने सांगतो की आमच्या भागातले लै लोकं आहेत पुण्यात अन ठाण्यात सुद्धा 😢😢 बावळ्यांनो झोपडपट्टीत इतके असल्याचा कसला आलाय अभिमान ? दूर देशात हमालीला जाऊन सुद्धा यांना आपापल्या जातीच्या पुढाऱ्यांचा, जातीचा माज वाटतो. खरंतर लाज वाटायला पाहिजे. तिथं कार्यक्रम ठेवतात, सप्ता घालतात.😠 त्यांच्या फोटोचे टी-शर्ट घालून त्यांचाच ऊस त...