शेतकरी
आम्हाला ताजे दुध घरपोच हवे, दुधाचे पदार्थ हवेत,आम्हाला ताजी फळे हवीत, ताज्या भाज्या घरपोच हव्यात. भाज्या आमच्या दारात पोहोचवायला शेतकरी शहरात आलेले चालतात , मात्र भावासाठी, हक्कासाठी आंदोलन करायला शेतकरी दिल्लीत आले कि देशद्रोही ठरतात ? आम्हाला लॉकडाऊन मध्ये मॉरोटोरीयम हवाय ,सरकारकडून सवलती हव्यात, मात्र शेतकरी अतिवृष्टी, गारपीट,दुष्काळात मदत मागायला लागला कि फुकट्या ठरतो ? शेतकऱ्यांची पोर सीमेवर गोळ्या खाऊन मेली कि शहीद होतात , राममंदिरासाठी काठ्या खाऊन जेलात गेली कि धर्मवीर होतात , मात्र शेतकऱ्यांनी भाकड गायी विकून दुभत्या गाई घ्यायच्या म्हटल कि शेतकरी धर्मद्रोही होतात ? शेतकऱ्याने पिकवलेली गोष्ट जीवनावश्यक कायद्यात येते, मात्र शेतकऱ्याच जगण आवश्यक वाटत नाही ? पगारदार माणसाच्या सिबिल स्कोअरवर ६ टक्क्याने आलिशान चारचाकीला कर्ज द्यायला बँकवाले दारात चपला झिजवतात , मात्र शेतकऱ्याला कुठल्याही कर्जासाठी १६-१८ मोजून बँकेचे उंबरे झिजवायला लागतात ? सगळे कायदे मध्यमवर्गाला पोटभर खायला मिळाव म्हणून बनवले जातात , मात्र शेतकऱ्याच पोट कायमच खपाटीला का असतय ? हा भारताचा इंडियाशी झगडा नेमका थांबणार...