शेतकरी
आम्हाला ताजे दुध घरपोच हवे, दुधाचे पदार्थ हवेत,आम्हाला ताजी फळे हवीत, ताज्या भाज्या घरपोच हव्यात. भाज्या आमच्या दारात पोहोचवायला शेतकरी शहरात आलेले चालतात ,
मात्र भावासाठी, हक्कासाठी आंदोलन करायला शेतकरी दिल्लीत आले कि देशद्रोही ठरतात ?
आम्हाला लॉकडाऊन मध्ये मॉरोटोरीयम हवाय ,सरकारकडून सवलती हव्यात,
मात्र शेतकरी अतिवृष्टी, गारपीट,दुष्काळात मदत मागायला लागला कि फुकट्या ठरतो ?
शेतकऱ्यांची पोर सीमेवर गोळ्या खाऊन मेली कि शहीद होतात , राममंदिरासाठी काठ्या खाऊन जेलात गेली कि धर्मवीर होतात ,
मात्र शेतकऱ्यांनी भाकड गायी विकून दुभत्या गाई घ्यायच्या म्हटल कि शेतकरी धर्मद्रोही होतात ?
शेतकऱ्याने पिकवलेली गोष्ट जीवनावश्यक कायद्यात येते,
मात्र शेतकऱ्याच जगण आवश्यक वाटत नाही ?
पगारदार माणसाच्या सिबिल स्कोअरवर ६ टक्क्याने आलिशान चारचाकीला कर्ज द्यायला बँकवाले दारात चपला झिजवतात ,
मात्र शेतकऱ्याला कुठल्याही कर्जासाठी १६-१८ मोजून बँकेचे उंबरे झिजवायला लागतात ?
सगळे कायदे मध्यमवर्गाला पोटभर खायला मिळाव म्हणून बनवले जातात ,
मात्र शेतकऱ्याच पोट कायमच खपाटीला का असतय ?
हा भारताचा इंडियाशी झगडा नेमका थांबणार कधी ?
Aand shitole
Comments
Post a Comment