Posts

Showing posts from April, 2018

अधुरी_एक_कहाणी

त्याने विचारलं असतं तर ती ' हो ' म्हणाली असती. तिने विचारलं असतं तर तो ही नाही म्हणाला नसता. पण हे त्यालाही जमलं नाही आणि तिलाही..... अशीच अधूरी राहिलेली एक प्रेमकहाणी.... तो आणि ती एकाच कॉलेजमधले पण वेगवेगळ्या ग्रूपमधले. तो तिला दोन वर्षांनी सिनिअर. एका कॉलेज प्रोग्रॅमच्या वेळी तिने त्याला बघितलं आणि बघताक्षणी तो तिला आवडला ती तशी चूझी. असं सहजासहजी तिला काही आवडणं शक्यच नसे. पण तो मात्र तिला आवडला. हळूहळू दोघांची एकमेकांशी ओळख झाली. अधूनमधून भेटही होऊ लागली , पण फक्त दोघच भेटली असं मात्र कधीच झालं नाही. जसजसा तो तिला कळत गेला तसतसं तिला जाणवत गेलं , " त्याच्या आणि तिच्या वाटा वेगळ्या आहेत त्या जुळणं शक्य नाही."मग तिने ठरवलं , " काहीही झालं तरी आपल्याला या स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडायलाच हवं. जे शक्य नाही त्याचा विचार कशाला करायचा ? पुढे जाऊन दोघांनाही त्रास होण्यापेक्षा आपण आत्ताच स्वतःला सावरलेलं बरं. पुढे त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि तो पुढच्या शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात निघून गेला. जाण्यापूर्वी तो सहजच( ?) म्हणून कॉलेजला येतो , तिलाही भेटतो. क...