आई तुझं ही चुकतंय..
तरूणपणात दागदागिने करताना मागेपुढं न पाहणारे नवरा बायको पूर्ण म्हातारपण आल्यावर श्रवणयंत्राचे पैसे खर्च करताना, " २५ हजार...... बापरे..... एवढे पैसे....... अजून किती जगणारे मी... चाललंय ना तितकं चालूंदेत.. उगाच काय पैसे वर आले का?"' असं म्हणतात. ... जो दागिना (श्रवणयंत्र) घातल्यावर आपल्याला नीट ऐकू येईल, आपण चारचौघांसारखं पुन्हा गप्पाटप्पा करू शकू, हे होणार असेल तर हरकत कायेरे ते दोन कानांचे मिळून ५० हजार गेले तर........ घरात पूजा करायला, भिकाऱ्यांना द्यायला, अहेर करायला, अन्नभोजन घालायला, नातेवाईकांच्या अडचणीत द्यायला पैसे असतात म्हाताऱ्यां माणसांकडे ! पण स्वत:च्या उपचाराकरीता किंवा घरात एक फूलटाइम काळजी घेणारी बाई ठेवण्याकरीता पैसे खर्च करायचं की झालं सुरू, बापरे ना बाबारे.. हा म्हंजे वायफळ खर्च.. का बुवा? आपण कमावलेलं आपल्या उतार वयात स्वत:वरच खर्च करताना पाच लाख वेळा विचार कायको? .. एक दिवस सर्वांना वर जायचंच आहे, तर मस्त एंजॉय करावं आणि मग मरावं ना रे.... सतत सगळ्याचा भाव करायचा.. आमच्या काळात हे असं नव्हतं तसं नव्हतं..... ठीकाय. पण आता काळ बदलेला आहे..... पूर्वी अ...