आई तुझं ही चुकतंय..
तरूणपणात दागदागिने करताना मागेपुढं न पाहणारे नवरा बायको पूर्ण म्हातारपण आल्यावर श्रवणयंत्राचे पैसे खर्च करताना, " २५ हजार......
बापरे.....
एवढे पैसे.......
अजून किती जगणारे मी... चाललंय ना तितकं चालूंदेत.. उगाच काय पैसे वर आले का?"' असं म्हणतात.
...
जो दागिना (श्रवणयंत्र) घातल्यावर आपल्याला नीट ऐकू येईल, आपण चारचौघांसारखं पुन्हा गप्पाटप्पा करू शकू, हे होणार असेल तर हरकत कायेरे ते दोन कानांचे मिळून ५० हजार गेले तर........
घरात पूजा करायला, भिकाऱ्यांना द्यायला, अहेर करायला, अन्नभोजन घालायला, नातेवाईकांच्या अडचणीत द्यायला पैसे असतात म्हाताऱ्यां माणसांकडे !
पण स्वत:च्या उपचाराकरीता किंवा घरात एक फूलटाइम काळजी घेणारी बाई ठेवण्याकरीता पैसे खर्च करायचं की झालं सुरू, बापरे ना बाबारे.. हा म्हंजे वायफळ खर्च..
का बुवा?
आपण कमावलेलं आपल्या उतार वयात स्वत:वरच खर्च करताना पाच लाख वेळा विचार कायको?
..
एक दिवस सर्वांना वर जायचंच आहे, तर मस्त एंजॉय करावं आणि मग मरावं ना रे....
सतत सगळ्याचा भाव करायचा.. आमच्या काळात हे असं नव्हतं तसं नव्हतं.....
ठीकाय. पण आता काळ बदलेला आहे.....
पूर्वी अमूक पैशांत बाई काम करत असे, अजूनही घरकामाची बाई २०० रू. रेटमध्ये काम करत राहिली तर तिला भाकरीऐवजी दगड नैत का खावे लागणार..
...
क्या ऐसा करते हो यार....
....
गोची म्हणजे, घरातली ही पिकली बकुळफुलं कसली क्यूट असतात.....
साला त्यांना ओरडलं तर नंतर आपल्या घशाखाली घास जात नाही.....
पण आपल्या डोळ्यातून नद्या वाहू द्या, समुद्र रिकामे हौद्या...
ही लोणच्यासारखी मुरलेली माणसं आपलं ते सोडत नाहीत.
......
सर्वच तरूण माणसांची आपल्या आईबापांबद्दल तक्रार आहे...
.....
आपला तोलही सांभाळता येत नसताना फूल तोडायला जाणे, पाण्यातली कामं करणे....
प्रचंड ट्रॅफिकमधे एकट्यानं प्रवास करणे. रस्ता क्राॅस करताना हात धरू म्हटले तर झिडकारणे, डोळे वटारणे..
नाही पाहवत.....
आपलं स्वावलंबन हरवत चाललेल्याची चेहऱ्या वर गडद होत जाणारी हताशा लपवण्यासाठीचे प्रयत्न जिवावरही बेतू शकतात आईसाहेब, थोडं आमचंही ऐका!

का काहो... आईबाप ज्जर्रा फ्लेक्झिबल नसतात..??
का का यांना कळत नाही की अमकं करू नकोस, हे सांगताना आपल्या मुलांनाही जड जातंय..?
का का हे कळत नाही की आपले आईवडील झिजत असताना मुलांना पाहवत नाही....?
त्यांचं पडणं झडणं आणि त्यापुढचे हाल मुलांना सहन होत नाहीत, म्हणून ती पोट तिडकीने तोंडाची मडकी वाजवत राहतात. पण ती फुटली तरी म्हातारी माणसं, तेच तेच सतत का का म्हणत राहतात की...
बाबा रे तूही म्हातारा झालास की माझ्यासारखा अस्साच पागल, हट्टी आणि तुझ्या मुलाचं काहीही न ऐकणारा होणारेस.....

म्हातारी माणसं डोळ्यातून पाणी काढतात, मुलांचं ऐकावं लागतं म्हणून.....त्यांच्यापुढे नमतं घ्यावं लागतं, असं वाटतं त्यांना....
....
ठार चूक आहे हे.....
....
यांनी मुलांना वाढवताना किती खस्ता खाल्या हे यांना सतत आठवतं. पण त्या खस्ता खात असताना, मिळेल त्यात समाधान मानणारी, ही मुलंच त्यांच्या आनंदाचं, उभं राहण्याचं, एकमात्र कारण होती.....
मूल, आईला जन्म देतं, असं म्हणतात.....
अशा मुलांनी काही सांगितलं तर ओरखडा आल्यासारखं वागायचं. NOT FAIR......

थोडंसं काम करून थकलेल्या वयस्कर आईवडिलांची जागी शरीरं आणि बंद डोळे पाहून पदरात असलेला सारा पैसा हरल्यासारखा वाटतो....
हे आणू का, ते आणू का.. काही विचारलं तरी उत्तर ठरलेलं असतं......"नाही."
साला आपण आपल्या पैशांनी घेतो काय काय त्याची नवलाईच वाटत नाही.....
पण लहान असताना आईबाप आणायचे ते बिनाफिटींगचे ढगळे फ्रॉक किंवा अपरेटिपरे शर्ट.. त्या नव्या कापडाचा वास, स्पर्श.. डोकं प्याक व्हायचं आनंदाने ! !
....
आम्हांला पैसे खर्च करायचेत तुमच्यावर.....
....
......
सतत वर जायची भाषा कशाला करता ......
......
वर बुकिंग फूल्ल आहे.....!

Comments
Post a Comment