Dr.Babasaheb Ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय मग आज तुमचा सन आहे .. सुट्टी आहे असेल ना शेजारच्याच मैत्रिणीने विचारलं , हो सुट्टी तर आहे पण तुमचा सन आहे अस म्हंटल्यावर जरा सांगावस वाटल तिला कि बाबासाहेब आमचे जितके आहेत तितके तुमचे हि आहेत मुळात हा आमचा तुमचा असा फरक त्यांनी नाही केला उलट आमच्यात आणि तुमच्यात असलेल जातिभेदाच वर्णभेदाच अंतर मात्र कमी केल..त्यांनी काय केल? एका दलित समाजासाठी लढा दिला आणि त्या समाजाला स्वतःच स्थान निर्माण करता आल, फक्त एवढच ना मग का आम्ही मानावं बाबासाहेबांना? आम्ही कुठे दलित आहोत? खरच एवढच केलंय का बाबासाहेबांनी? कि फक्त एवढच माहित आहे आपल्याला? त्याचं सामाजीक कार्य आपल्याला माहित आहे पण त्याचबरोबर त्याचं राजकीय, आर्थिक, धार्मिक कार्य आणि या प्रत्येक कार्यात केलेली क्रांती आपल्याला माहित आहे का? त्यांची निर्मिती असलेल संविधान, हिंदू कोड बिला बद्दल माहिती,प्रोब्लेम ऑफ रुपी नावाच्या ज्या पुस्तकावर रिझर्व बँक ऑफ इंडिया आधारली आहे ते आपण वाचलंय का? स्वतंत्र भारताचे कायदेमंत्री म्हणून काम पाहताना त्यांनी घटनेत मजुरांसाठी ज्या तरतुदी केल्या, provident fund ...