एकटी राहणारी लोक भावनिक असतात. त्यांना भीती असते गुंतण्याची. त्यांच्यात हिंमत नसते नकार पचवण्याची. सहवासात राहून काहींना त्या व्यक्तीची सवय होते तर काहींना प्रेम. सवय झालेली लोक सहवास तुटला की दुसऱ्या कुण्या व्यक्तीच्या सहवासात सहज निभावून जातात. प्रेम झालेला माणूस. कोसळतो. झुरतो. किंवा मग कायम एकटा होऊन जातो. गर्दीतसुद्धा एकटा राहायला लागला की समजून जायचं. याला आता कुणाच्या सोबतची गरज नाही तर कुणी सोबत राहिले तर प्रेम होऊन त्रास होण्याची भीती जास्त आहे. ती व्यक्ती अलिप्त होते. भावनिक गुंता सोडून व्यावहारिक एकत्र होत आपला कार्यभाग साध्य करते. अनोळखी शहरात जाऊन तिथेच कायम राहावं. इच्छा झाली तरी कुणाशी ओळख करू नये. सर्वांकडे बघून फक्त गोड स्माईल देऊन आपल्या कामाने पूढे निघून जावं. कुणाला नाव विचारू नये.कुणाशी गट्टी जमवू नये. कुणाच्या डोळ्यात बघू नये. पूर्ण चेहरा व्यक्तीचा बघून आपल्याकडे बघतोय तर फक्त येऊ अनोळखी चेहऱ्याने स्माईल देऊन पूढे निघून जावं. आपल्याच कामात व्यस्त राहून इतकं थकून भागून परतावं की झोपी शिवाय कुणी सखा वाटू नये. स्वप्नांशिवाय इतरत्र कुठेही संवाद होऊ नये. इतरांना आ...
Posts
Showing posts from September, 2021