Posts

Showing posts from March, 2017

होतं असं कधी कधी......

खूप महत्वाच्या मीटिंग मध्ये असतो आपण...बऱ्याच वर्षांनी अचानक एका जवळच्या मित्राला आठवण येते आपली....इचछा असूनही कॉल उचलू शकत नाही..संध्याकाळी घरी आल्यावर आठवण येते ...परत कॉल करावा तर बोलायला विषय नसतो आपल्याकडे ...टाळतो आपण कॉल करायचा .....त्याचा दोन दिवसानंतर मेसेज येतो...तुझ्या ऑफिस बाहेर होतो ...भेटलो असतो..जुन्या आठवणी काढत बसतो आणि मन रमवतो त्यातच .... स्वतःला खोटं समजावत.... कडक उन्हात सिग्नल ला बाईक उभी असते आपली ...रस्त्याच्या कडेला एक वृद्ध जोडपं असतं मागत लोकांना...माया,कणव दाटून येते मनात आपल्या ...कसं आपल्या आई वडिलांना लोक असं वाऱ्यावर सोडत असावेत?? पाकिटात हात जातो...शंभराची नोट लागते हाती...व्यवहार जागा घेतो ममतेची...समोरचा म्हातारा ओळखतो बदल तो...दहा दिलेस तरी खूप आहेत पोरा...तो सुटका करतो आपली पेचातून....आपल्याच नजरेत आपल्याला छोटं करून.... दिवाळीचे पाहुणे असतात जमलेले ....आज कामवाली येणार कि नाही याची धाकधूक असते...तिच्या असण्याने आपण किती निवांत आहोत याची जाणीव होते अशा वेळी...दुपारची जेवणे उरकून गप्पा रंगात आलेल्या असतात....ती येते......

कमिटमेण्ट फोबिया

Image
आपल्या नात्याला आॅफिशियल नात्याचा दर्जा देण्याची भीती का वाटते अनेकांना?     ‘अरे राजा वेडा झालास का? कशाला लग्नाच्या भानगडीत पडतोस? अजूनही वेळ गेलेली नाहीये, विचार कर, एकदा बांधून घेतलंस की सुटका नाही.’ लग्नाळू मुलांना किंवा गर्लफ्रेण्डला प्रपोज करून औंदा बार उडवायचाच या इच्छेने पछाडलेल्या बॉयफ्रेण्ड्सला मिळणारा हा आगंतुक सल्ला. हा सल्ला सध्याच्या लग्नसराईमध्येही घुमतोय. आणि तसं पाहिलं तर या सल्ल्याला कोणी सिरिअसली घेतही नाही. स्वत: शादी का लड्डू खाल्लेला मित्र किंवा मोठा भाऊ किंवा धाकटा काका असले कोणी या सल्ल्याचा मुळाशी असतात. ‘मला तर नाही चान्स, तू तरी तुझं सिंगल लाईफ उपभोगून घे.’ असलं काही बाही सांगत असतात बायकोची नजर चुकवून. पण हाच सल्ला आपल्यापेक्षा चार वर्षांनी लहान असलेला भाऊ किंवा मित्राने दिला तर? ज्याचं लग्नाचं सोडा; पण गर्लफ्रेण्ड असण्याचा तरी वय आहे का, असा प्रश्न पडू शकेल त्याला सिंगल असण्याचं आणि आयुष्यभर कोणालाही बांधील ना राहण्याचं एवढं आॅबसेशन? कसं शक्य आहे. पण ते हल्ली आहे. कारण आजकाल तरुणाच्या, इस्पेशली, मिलेनिअल्सच्या मनात असलेली कमिटमेण्टची...

मीरा

Image
  मीरा होणं कठीण की राधा.. हे कोणीच नाही ठरवू शकणार... दोघींची तुलना करण्याचा प्रयत्नही करू नये कोणी.. पण तरीही कधी वाटतं , राधेला थोडंतरी झुकतं माप मिळालं दैवाकडून.. आयुष्याच्या एका टप्प्यावर , काही काळ का होईना , कृष्णानं राधेची प्रीत स्वीकारली. त्याच्या मुग्धमधुर लीला राधेच्याच नशिबी....! पण मीरा.. तिच्या प्रेमाची रीतच न्यारी..! कधीही न भेटलेल्या त्या सावळ्यासाठी तिनं आयुष्यभराचं व्रत घेतलं.. प्रेमाचं महाकठीण व्रत.. जे फक्त तिलाच पेललं.. पग घूँघरू बाँध मीरा नाची रे। मैं तो मेरे नारायण की आपहि हो गई दासी रे। लोग कहै मीरा भई बावरी न्यात कहै कुलनासी रे॥ विष का प्याला राणाजी भेज्या पीवत मीरा हाँसी रे। 'मीरा' के प्रभु गिरिधर नागर सहज मिले अविनासी रे॥  

शिवाजी कोण होता?

Image
छत्रपतींविषयी समाजात वेगवेगळय़ा प्रकारचे गैरसमज पसरवण्याचं काम सातत्यानं आणि गेली अनेक वर्षं केलं जात आहे. शिवरायांच्या हयातीतच त्यास प्रारंभ झाला होता, ही बाब तर सर्वश्रुतच आहे. पण पानसरे यांनी त्या सर्व समज-गैरसमजांना सज्जड पुराव्यानिशी छेद देत, त्यातून हा `जाणता राजा' कसा सर्व समाजाचा आणि विशेषत: `आम आदमी'चा राजा होता, ते दाखवून दिलं आहे.इतिहासातील थोर पुरुषांना वेठीस धरून स्वार्थ साधण्याचा खेळ आपल्या देशात वर्षानुवर्ष सुरू असल्यामुळेच या थोर पुरुषांची नेमकी ओळख करून घेणं जरुरीचं असतं. कारण इतिहासाचं विकृतीकरण करून या थोर पुरुषांची खरं तर बदनामीच झालेली असते. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत गोविंद पानसरे यांनी `शिवाजी कोण होता?' हे पुस्तक लिहून फार मोठी कामगिरी २२ वर्षांपूर्वीच बजावलेली आहे. खरं तर हे पुस्तक नव्हेच ती एक छोटेखानी, अवघ्या ७४ पानांची पुस्तिका आहे. पण त्या पुस्तकातून पानसरे यांनी उभं केलेलं छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्त्व, हे कोणाला सातशे पानं लिहून जमणार नाही, इतकं प्रभावी आहे. downloa bookby daily hunt https://doc-0s-38-docs....

चेहरा क्या देखते हो…

चेहरा क्या देखते हो… सौंदर्याची संकल्पना काय…? असा प्रश्न जर मला विचारला तर आजही दोन मिनिटं थांबून मी विचार करतो. कारण ती मला कायम काठावरून पाहण्याजोगी गोष्ट वाटलीय. मला एक गोष्ट कायम वाटते की, सौंदर्य म्हणजे आरशासमोर उभं राहील की जे दिसतं ते नाही… तुमचं मन, बुद्धी, शक्तिस्थानं.. माझ्या दृष्टीने हे सौंदर्य आहे.. अगदी खरं सांगू का.. सुंदर असण्याची व्याख्या ज्या ज्या वेळी केली जाते, त्यावेळी अजूनही आपण किती कर्मठ आहोत असंच मला वाटतं. कारण आपल्या शारीरिक सौंदर्याच्या तर अगदी ठरवलेल्या चौकटिबध्द संकल्पनांमध्ये आजही आपण अडकून आहोत. मागे वळून पाहताना आज मला आठवतो तो म्हणजे जवळ जवळ १३ वर्षांपूर्वीचा सिद्धार्थ जाधव… किरकोळ अंगाचा, झिपरे केस, गाल आत आणि दात बाहेर.. मी असाच एका हिंदी टेलिव्हिजन सिरीयलच्या ऑडिशनला गेलो. त्यांचा लंच ब्रेक झाला होता आणि माझ्या सारखा मुलगा ऑडिशनला आलेला बघून त्यांना तर आयता बकरा मिळाला टाईमपास करायला, म्हणून त्यांनी मला २ लाईन्स बोलायला सांगितल्या आणि मला सिलेक्शनबद्दल नंतर कळवतील असं सांगितलं. मला माहिती होतं कि हे लोक मला सिलेक्ट करणार नाही आहेत...