मीरा
मीरा होणं कठीण की राधा..
हे कोणीच नाही ठरवू शकणार...
दोघींची तुलना करण्याचा प्रयत्नही करू नये कोणी..
पण तरीही कधी वाटतं, राधेला थोडंतरी
झुकतं माप मिळालं दैवाकडून..
आयुष्याच्या एका टप्प्यावर, काही काळ का
होईना,
कृष्णानं राधेची प्रीत स्वीकारली.
त्याच्या मुग्धमधुर लीला राधेच्याच नशिबी....!
पण मीरा.. तिच्या प्रेमाची रीतच न्यारी..!
कधीही न भेटलेल्या त्या सावळ्यासाठी
तिनं आयुष्यभराचं व्रत घेतलं..
प्रेमाचं महाकठीण व्रत.. जे फक्त तिलाच पेललं..पग घूँघरू बाँध मीरा नाची रे।
मैं तो मेरे नारायण की आपहि हो गई दासी रे।
लोग कहै मीरा भई बावरी न्यात कहै कुलनासी रे॥
विष का प्याला राणाजी भेज्या पीवत मीरा हाँसी रे।
'मीरा' के प्रभु गिरिधर नागर सहज मिले अविनासी रे॥

Comments
Post a Comment