Posts

Showing posts from October, 2017

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे...

काही नाती आयुष्यात व्यक्त करता येत नाही. कारण ती आपल्यालाच नीट समजलेली नसतात तर आपण समोरच्याला आपल्याला काय वाटते ते नक्की कस सांगणार हा गोंधळ मनात सुरु असतो. आयुष्याच्या अनेक टप्प्यावर अनुभव घेतल्यावर एक परिपक्व नात असावं वाटते आणि ते हि आपल्या विरुद्ध लिंगी व्यक्तीशी. दोन वैचारिक पातळीतील फरक खरे तर एका परिपूर्ण नात्याला आकार देतो त्याला स्थैर्य देते. पण हि तारेवरची कसरत खूप कमी जण निभावून नेऊ शकतात. मैत्री एक सुंदर नात. त्या पुढल पाउल प्रेमाच असल तरी त्या दोन पाउलात खूप मोठा पल्ला गाठावा लागतो. ह्या मध्ये सुद्धा नात बनवता आणि टिकवता यायला हव. किंबहुना वयाच्या उत्तरार्धात जेव्हा शारीरिक, भावनिक, कौटुंबिक अश्या सगळ्या पातळ्यांवर प्रेम, मैत्री हे अनुभवलेलं असते. त्यावेळेस निखळ, निरपेक्ष मैत्री पेक्षा हि मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे असणाऱ्या नात्याची गरज प्रकर्षाने जाणवते. पण अस कोणीतरी आपल्या आयुष्यात येण आणि ती व्यक्ती टिकवून ठेवणे हे सगळयांना जमते अस नाही. मैत्री आणि प्रेम ह्यामध्ये हि नात असू शकते हि मानसिकता आपण निर्माण केलीच नाही. मैत्री आणि प्रेमाच्या भावना ह्य...