Posts

Showing posts from February, 2016

विनायक दामोदर सावरकर

Image
  १८५७ च्या स्वातंत्र्य स्मरा नंतर सशस्त्र क्रांतीचा ईतिहास वीर सावरकरांच्या नावा शिवाय पूर्णच होऊ शकत नाही . स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये त्यांनी दिलेली पूर्णाहुती , त्यासाठी ज्यां यातना , हाल - अपेष्टा सहन केल्या त्याचा ईतिहास जर साक्षी नसता तर पुढील क्रांती घडणे अशक्य होते . * सावरकरांचे मुळ घराणे कोकणचे , परशुराम भूमीतील गुहागर विभागातले . छत्रपती शिवराय , आणि बाजीरावांच्या काळात त्यातील काही घराणी देशावर आली . त्यातीलच सावरकर कुटुंब नाशिक जवळील भगूर येथे स्थिर झाले . येथेच २८ मे १८८३ रोजी दामोध्ररपंत सावरकरांच्या पत्नी सौ . राधाबाई यांनी चौथ्या मुलाला जन्म दिला . त्यांचे तेजस्वी नेत्र , विशाल भाळ , आकर्षक मुद्रा पाहून नाव ठेवले विनायक , म्हणजे विशेष नायक ! पण याच विनायका ला लहानपणात मातृ सुखाला पारखे व्हावे लागले . * लहानाचे मोठे होत असताना त्यांना लेखन व वक्तृत्व या गुणांचा छंद जडला . एकदा एका वक्तृत्व स्पर्धेची बातमी त्यांना उशिरा समजली . तरीही त्यां...