Posts

Showing posts from December, 2020

सोनिया गांधी

 त्यांना गांधींचा खून करता येतो. पण, गांधींना प्रातःस्मरणीय मानल्याशिवाय आणि गांधींचा आदर्श सांगितल्याशिवाय पंतप्रधान होता येत नाही. ही या देशाची खासियत आहे.  गांधींच्या या वाटेवरून हमखास चालणारी आणि जगात काही झाले, इकडचे जग तिकडे झाले, तरी त्या मूल्यात्मकतेला जिवापाड जपणारी खात्री म्हणजे सोनिया गांधी.  कमला हॅरिस आणि जेसिंडा अर्ड्रनच्या यशकथांमध्ये रमणा-यांनी 'सोनिया गांधी' नावाची यशकथा कधीतरी नीट समजून घ्यायला हवी.  विरोधात असताना ही बाई सगळा विरोध एकटीनं अंगावर घेते आणि सत्तेत असताना, त्या सत्तेचा वाराही स्वतःला लागू न देता इतरांना सिंहासनावर बसवते. तिला विदेशी ठरवून ज्यांनी तिची साथ सोडली, त्यांना अखेरीस तिच्या क्षमाशीलतेनंच सत्ता मिळू शकली. तिच्यावर नको ती टीका करणा-या पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठीही तिच्याच होकाराची वाट पाहावी लागली.  आपल्या नव-याच्या मारेक-यांनाही माफ करणारी ती मुळातच क्षमाशील. खरा भारत समजलेली बाईच हे करू शकते. तिला राम समजला, कृष्ण समजला, बुद्ध समजला, पैगंबर समजला, येशू समजला, गुरू नानक समजला, कबीर समजला. गांधींचा आतला आवाज समजला....