Posts

Showing posts from September, 2017

कमजोर नातं?

आज इतक्या वर्षांनी आठवण तरी आली. अननोन नंबर वरून फोन आला खरा,पण पलीकडचा आवाज चांगलाचं ओळखीचा होता. हा आवाज कसा विसरेन मी. या मधाळ आवाजतलं कडवेपणही तितकंच चाकुन झालेलं. थोड्यावेळ विश्वास नाही बसला.बसणार तरी कसा, परकं झालेलं आपलं माणूस फोनवर होतं. कसं असतं ना, माणूस कितीही त्रास देऊन गेलं तरी पुन्हा आवाज ऐकल्यानंतर ओढ लागतेच... सहा वर्षे झाली आता. घरी आईवडिलांना कळालं आणि नातं तुटलेलं आमचं. इच्छा नसताना आयुष्यात वेगवेगळं पुढे जाण्याचा तिने घेतलेला निर्णय. पहिल्यापासूनच खमकी होत ी. भावना बाजूला सारून प्रक्टिकल निर्णय पटकन घ्यायची. आईवडिलांच्या प्रेमाखातर मला दूर करण्याचा निर्णयही तिचाचं. बुद्धीने तल्लख, दिसायला देखणी, फडफड इंग्लिश बोलणारी. माझ्यात उगाच घुटमळली. ते एक वर्ष वाया गेलं नसतंं तर कदाचीत अजून चांगल्या कॉलेजला नंबर लागला असता तिचा. अल्लड वय,मोह, आकर्षण...पडलो प्रेमात. म्हणाली, “तुझी आठवण येतीये. गेले कित्येक दिवस सतत तुझं असणं जाणवतं.काहीही न सांगता मी निघून आले. मान्य आहे मला, चूक झाली माझी. त्याची शिक्षाही मिळाली. फोन नंबर बदलला, तुझा नंबर ब्लाँक लिस्टमध्ये टाकला. वाटलं,...