Whatsapp Diaries
मी तुझ्या चॅटमधून बाहेर पडतो. माणूस नाती स्वार्थासाठी निर्माण करतो हेच खरं.. मी नाही करत तुला msg.. मुद्दाम.. "तिने करावा आपणहून msg मला" , माझा अहं मला सांगत राहतो.. शेवटी तू झोपतेस तशीच.. मी इकडे तळमळत राहतो माझ्या अहं ला कुरवाळत.. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडते. तू ग्रुप वर चांगली active असतेस. मग एक msg मला करायला काय जात होतं ? त्यात तुझा असा अविर्भाव असतो जणू काही आपल्यात काही नाहीचे ! सकाळही तशीच निघून जाते. दुपारची जेवणाची वेळ होते.. "Jevlas ka ?" वगैरे msgs ची अपेक्षा कधीच सोडल्ये मी.. पण lunch ब्रेक मध्ये 'Hiii' टाकू शकत होतीस... संध्याकाळ होते... मी न राहवून 'Hi' टाकतो. या 'Hi' मधे कटाक्षाने एकंच 'i' येईल याची काळजी घेतो. तुला माझं काहीतरी बिनसलंय याची जाणीव व्हावी म्हणून.. 'आता रात्रीचं जेवण होईपर्यंत whatsapp बघायचं नाही' मी ठरवून टाकतो. आता बघू दे तिला माझ्या msgs ची वाट... मी अधीर मनाने जेवण कसंबसं उरकून, रात्री ऑनलाईन येतो.. खरंतर इतका अधीर असतो मी, की उष्ट्या हातानेच मोबाईल घेणार असतो. पण... आई...?? तुझा...