Dr.Babasaheb Ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
काय मग आज तुमचा सन आहे .. सुट्टी आहे असेल ना शेजारच्याच मैत्रिणीने विचारलं , हो सुट्टी तर आहे पण तुमचा सन आहे अस म्हंटल्यावर जरा सांगावस वाटल तिला कि बाबासाहेब आमचे जितके आहेत तितके तुमचे हि आहेत मुळात हा आमचा तुमचा असा फरक त्यांनी नाही केला उलट आमच्यात आणि तुमच्यात असलेल जातिभेदाच वर्णभेदाच अंतर मात्र कमी केल..त्यांनी काय केल? एका दलित समाजासाठी लढा दिला आणि त्या समाजाला स्वतःच स्थान निर्माण करता आल, फक्त एवढच ना मग का आम्ही मानावं बाबासाहेबांना? आम्ही कुठे दलित आहोत? खरच एवढच केलंय का बाबासाहेबांनी? कि फक्त एवढच माहित आहे आपल्याला? त्याचं सामाजीक कार्य आपल्याला माहित आहे पण त्याचबरोबर त्याचं राजकीय, आर्थिक, धार्मिक कार्य आणि या प्रत्येक कार्यात केलेली क्रांती आपल्याला माहित आहे का? त्यांची निर्मिती असलेल संविधान, हिंदू कोड बिला बद्दल माहिती,प्रोब्लेम ऑफ रुपी नावाच्या ज्या पुस्तकावर रिझर्व बँक ऑफ इंडिया आधारली आहे ते आपण वाचलंय का? स्वतंत्र भारताचे कायदेमंत्री म्हणून काम पाहताना त्यांनी घटनेत मजुरांसाठी ज्या तरतुदी केल्या, provident fund काय फक्त दलिताना मिळतो का? कामाचे तास १२-१४ वरून ८ तास दलीतांसाठीच केले गेले का?, धरणे, पाटबंधारे तसेच उर्जाक्षेत्रातली त्यांची कामगिरी आपणास कुठे ठावूक आहे? स्त्रियांच्या हक्कासाठी आणि त्यांना समाजात योग्य स्थान मिळण्यासाठी आणि त्यांच्या स्वातंत्र्यासाठी जे हिंदू कोड बिल तयार केल त्याबद्दल माहित आहे का? आणि हिंदू कोड बिल पूर्णपणे मान्य न झाल्यामुळे त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला हे सुद्धा माहित नसेलच ना? कारण माहित असत तर बाबासाहेबांना तुम्ही तुमचे नाही तर आपले म्हंटल असत..... बाबासाहेब म्हणजे म्हणजे कुठली जात नाही, धर्म नाही तर ती एक परिवर्तनवादी शक्ती आहे..........
भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती निम्मित सर्वांनाच शुब्भेच्छा
जय भीम ___/\___
From vishakha & antarng team
Comments
Post a Comment