एक कट्टर 'मरा'ठवाडाकर

 किती शहरं, किती घरं- दारं !!😢😢

आमच्या फक्त T.C वर नाही तर कपाळावर सुद्धा लिहून ठेवलंय भटके विमुक्त 😢😢

त्यामुळे अडाणी बापे-बाया पवार, पाटील, विखेंच्या कारखान्यावर, 

कवळी पोरं मुंबई-पुण्यात टाटा-बाटाच्या कारखान्यात, 

कोणी गुजरात मध्ये शहा, पटेलच्या ऑइल, कापड मिल मध्ये .. 

तर कोणी मध्यप्रदेशात शर्मा, सिंधीयाच्या गोडाऊन मध्ये हमालीला.😢

आमच्या भागात पाणी नाही, मोठ-मोठी धरणं, प्रकल्प नाहीत, कसले कारखाने नाहीत, चांगल्या शाळा-कॉलेज नाहीत, काही भाग सोडला तर अजून अख्ख्या जिल्ह्यात रेल्वे सुद्धा नाही.😢😢


धड रस्ते नाहीत की नीट दवाखाने नाहीत.

हाताला काम नाही. 

फक्त युवा नेते, सामाजिक कार्यकर्ते अन बोगस पत्रकारांचा सुळसुळाट..


तरीही आम्ही यडझव्या गत गर्वाने सांगतो की आमच्या भागातले लै लोकं आहेत पुण्यात अन ठाण्यात सुद्धा 😢😢

बावळ्यांनो झोपडपट्टीत इतके असल्याचा कसला आलाय अभिमान ?

दूर देशात हमालीला जाऊन सुद्धा यांना आपापल्या जातीच्या पुढाऱ्यांचा, जातीचा माज वाटतो. खरंतर लाज वाटायला पाहिजे.

तिथं कार्यक्रम ठेवतात, सप्ता घालतात.😠


त्यांच्या फोटोचे टी-शर्ट घालून त्यांचाच ऊस तोडतो. त्यांच्याच कारखान्यावर राबतो ढोरासारखं ....

ऊस पण त्यांचा, ऊसाचे कारखाने त्यांचेच, ऊसतोड कामगारांचे नेते पण तेच ....

साला ss चुत्यात काढायची पण हद्द असते राव 😢


अन्याय करणारे तेच अन न्याय करणारे ही तेच. 

पण असो ss

लोकांनाच ते आवडतं😢😢

भक्तांना तर माय-बहीनींचे गर्भाशय काढले तरी वाईट वाटेनाय कारण यांचे मेंदूशयच गुलाम झालेले आहेत.

अन पुण्यात येऊन आम्ही सांगणार गर्वच नाही तर माज आहे अमूक-तमूक असल्याचा, अमूक कर असल्याचा.


हाच माज शेवटी 'मराठवाडा' नावाने टपरी टाकून जिरल्या जातो.

जेव्हा पश्चिम महाराष्ट्रातली फॉर्च्युनर दारात येऊन आवाज येतो ss 

भैय्या 1 मसाला पान लाव, सुपारी कमी टाक.

पानाला चुना लावताना शेवटी लक्षात येतं, आपल्याला पण असाच चूना लागलाय.


गेल्या 13 वर्षात माझं आयुष्य भटक्या कुत्र्या सारखं झालंय. जिकडं वास येईल तिकडं निघायचं..

कोणाचा पट्टा गळ्यात घालून कोणाच्या मळ्यात जातोय हेच कळेनाय.

माझा गाव पण असाच भटका आहे. गावात फक्त म्हतारे दिसतील.

सगळे देशाला, 

कुठं-कुठं तर 6-6 महिने लेकरंबाळं अन मायबापाच्या, नवरा-बायकोच्या भेटी गाठी भी होत नाहीत.

कधी थांबेल रे ही जीवाची आदळ-आपट ?

तिकडे सगळे साहेब मात्र स्कॉर्पिओ तून फॉर्च्युनर मार्गे फोर्ड'इंडेव्हर मध्ये केव्हाच आलेत.

 😢😢


- चांगदेव गिते

 एक कट्टर 'मरा'ठवाडाकर

Comments

Popular posts from this blog

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे...

मराठी का गरजेची?

लोकशाही आणि संसद