झुंड

 मुळात नागराज अण्णा फ्रेमच्या माध्यमातून व्यक्त होणारे व्यक्ती आहेत. त्यांची जितकी स्क्रिप्ट महत्वाची असते त्याहून अधिक महत्व असतं फ्रेमला. बोराडे मास्तर जेव्हा या मुलांमधील पोटेनशीयल ओळखतात तेव्हा तो फक्त गड्डी गोदाम पुरता मर्यादित असतो.पण, तिथून देशभरातील अगदी मोनिका गेडाम ते तिकडे उत्तरप्रदेश , आसाम सारख्या राज्यातील लेकरांना प्लॅटफॉर्म दिसायला लागतो. मोनिका गेडाम सारखी मुलगी जिचा शाळेचा , जन्माचा असा कुठला दाखला नाही ती या 'फुटबॉलच्या' , बोराडे मास्तरांच्या माध्यमातून विदेशात जाते. इतर टीम सर्वच... यांच्यात साम्य काय आहे? झोपडपट्टीमधून, गरीब घरातून आलेली मुलं. 


अगदी बोराडे मास्तरच्या घरात गेल्यावर ते उभ्या आयुष्यात पहिल्यांदा कुण्यातरी आरसीसीच्या घरात बसलेली असतात. नागराज अण्णा अशा स्टोरीतून या मुलांना स्टारडम उपलब्ध करून देतोय. यासाठी खूप जास्त कस लागतो. अगदी हिरो बनणारी लोकं मुंबई जवळ करतात पण नागराज या लोकांना शोधत पार गोंदिया जिल्ह्यातील दुर्गम खेड्यात जाऊन माणसे शोधतो. मोनिका गेडामचा बाप केवळ सिनेमात आदिवासी नाही राहत. तो खऱ्या जीवनातही आदिवासीच असतो.त्याच्या घरी अजून टीव्ही पोचला की नाही? याची शाश्वती नसतांना ती व्यक्त आज जगातल्या बाराशे थेटरच्या स्क्रिनवर असते. ज्या व्यक्तीच्या घरात टीव्ही पोहचणे कठीण ती व्यक्ती उभ्या आयुष्यात बॉलिवूडच्या गोरेगावमध्ये पोहचू शकली असती का? नाहीच.


नागराज अण्णा स्वतः यांच्यापर्यंत पोचतो. यांना सिनेमात घेऊन यांचीच गोष्ट यांच्याच माध्यमातून जगाला सांगतो. मग यात सिलेक्टिव्ह महापुरुष, सिलेक्टिव्ह आडनावे ओघानेच येतील. कारण ज्यांच्यासाठी या महापुरुषांनी तेव्हा संघर्ष केला, ज्यांच्यातील पोटेनशीयल साडे तीनशे वर्ष आधी शिवाजी महाराजांनी, नंतर फुले, शाहू आंबेडकरानी ओळखलं आणि यांच्यामुळेच बोराडे मास्तर सारख्या लोकांना नजर मिळाली, पोटेनशीयल ओळखण्याची. या महापुरुषामुळे संवेदना जाग्या होऊ शकल्या. हे प्लॅटफॉर्म कायम वाढत जाण्याची निव या लोकांनी रोवली.


झोपडपट्टीवर फिल्म तयार होत असताना अभिजन, सवर्ण उच्चभ्रू आडनावाचा हिरो तुम्ही जर अपेक्षित करीत असणार तर या वस्त्यांमध्ये एकतरी अशा आडनावाचे असायला हवे.


जातीय द्वेष व कलेला आपले प्रिव्हिलेज कायम ठेवून बघणारी नजर कधी या लोकांना मोठ्या पडद्यावर , आणि स्वतः अभिनेत्याच्या भूमिकेत सहन करू शकणार नाही. म्हणून गड्डी गोदाममध्ये राहणाऱ्या रितीक उईकेला प्रश्न पडत असतो भारत म्हणजे?आणि भारताचा हा दुसरा चेहरा दाखवण्याचे काम नागराज अण्णा करतायत.


अमिताभच्या घरा बाजूला कित्येकांचे ऑफिस असतील , कित्येकांच्या हयात गेल्या एकदा तरी अमिताभ भेटला, दिसला पाहिजे म्हणत... नागराज अण्णांनी थेट झोपडपट्टीमधील पोरं दिवसरात्र त्याच्या सोबत ठेवली. आणि त्यांना थेट मुख्यप्रवहात आणलं. कारण तो मुंबईत ऑडिशन द्यायला येणाऱ्या लोंढ्यात स्वतःला गुंतवून ठेवत आपलं मूळ विसरला नाही. 


- अक्षय कांबेकर


#jhundreview #jhundthemovie #jhund #NagrajManjule #amitabhbachchanfans

Comments

Popular posts from this blog

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे...

मराठी का गरजेची?

लोकशाही आणि संसद