एकटी राहणारी लोक भावनिक असतात. त्यांना भीती असते गुंतण्याची. त्यांच्यात हिंमत नसते नकार पचवण्याची. सहवासात राहून काहींना त्या व्यक्तीची सवय होते तर काहींना प्रेम. सवय झालेली लोक सहवास तुटला की दुसऱ्या कुण्या व्यक्तीच्या सहवासात सहज निभावून जातात. प्रेम झालेला माणूस. कोसळतो. झुरतो. किंवा मग कायम एकटा होऊन जातो. गर्दीतसुद्धा एकटा राहायला लागला की समजून जायचं. याला आता कुणाच्या सोबतची गरज नाही तर कुणी सोबत राहिले तर प्रेम होऊन त्रास होण्याची भीती जास्त आहे. ती व्यक्ती अलिप्त होते. भावनिक गुंता सोडून व्यावहारिक एकत्र होत आपला कार्यभाग साध्य करते. अनोळखी शहरात जाऊन तिथेच कायम राहावं. इच्छा झाली तरी कुणाशी ओळख करू नये. सर्वांकडे बघून फक्त गोड स्माईल देऊन आपल्या कामाने पूढे निघून जावं. कुणाला नाव विचारू नये.कुणाशी गट्टी जमवू नये. कुणाच्या डोळ्यात बघू नये. पूर्ण चेहरा व्यक्तीचा बघून आपल्याकडे बघतोय तर फक्त येऊ अनोळखी चेहऱ्याने स्माईल देऊन पूढे निघून जावं. आपल्याच कामात व्यस्त राहून इतकं थकून भागून परतावं की झोपी शिवाय कुणी सखा वाटू नये. स्वप्नांशिवाय इतरत्र कुठेही संवाद होऊ नये. इतरांना आपल्या मनात स्पेस देत जगत राहणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्याच्या बाबत विचार करायला वेळच नाही मिळत. जेव्हा त्याने याला त्याला मनाच्या कोपऱ्यात वाटून दिलेल्या स्पेस वेळेनुसार रिक्त होत जातात. तेव्हा तो जितका एकटा पडतो. लांबवर पसरलेल्या वाळवंटात मृगजळ असतं तितकाच तो एकटा होऊन जातो. माणूस आतून एकटा पडला की कुठली गर्दीही त्याला आपल्याकडे खेचू नाही शकत. चालते फिरते माणसे निहाळणारा व्यक्ती झालेला माणूस आतून स्वतःशी इतका संवाद साधतो की, त्याच्या त्या स्वतःशी साधलेल्या संवादाला शब्दबद्ध करणे कठीण होऊन जाते. मनाची स्पेस ही लय जपावी लागणारी गोष्ट आहे. आपण ती देऊ शकतो. पण स्वतःहून काढून घ्यायला आयुष्यातील मौल्यवान वेळ खर्च करण्याची तयारी ठेवावी लागते.इतकंच.

By unknown

Comments

  1. काही वेळ आस वाटल की स्वतः लिहिलेला ब्लॉग वाचत आहे...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे...

मराठी का गरजेची?

लोकशाही आणि संसद